# पालखेड कालवा आधुनिकरणासाठी 1300 कोटीचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनाःसादर श्री,शंकरराव वाघ भाजपा नाशिक जिल्हा अध्यक्ष – जन आवाज न्युज
ताज्या घडामोडी

पालखेड कालवा आधुनिकरणासाठी 1300 कोटीचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनाःसादर श्री,शंकरराव वाघ भाजपा नाशिक जिल्हा अध्यक्ष

जन आवाज न्यूज नेटवर्क.

Amazon.in/ONLINE SHOPPING
पालखेड कालवा आधुनिकरणासाठी 1300 कोटीचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनाःसादर श्री,शंकरराव वाघ भाजपा नाशिक जिल्हा अध्यक्ष

 नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, निफाड ,येवला, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर अशा तीन जिल्ह्यांतील पाच तालुक्यातील जवळपास 42 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखा ली आणणाऱ्या पालखेड डाव्या कालव्यासाठी SIMP (सिम्प) अंतर्गत ADB च्या सहाय्याने जलसंपदा विभागाच्या पालखेड पाटबंधारे खात्याने पालखेड डाव्या कालव्याच्या आधुनिकीकरण करण्यासाडी रु १२८२.२० कोटी इतक्या रकमेचा प्रस्ताव सादर केला आहे. तो प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर करावा यासाठी नाशिक जिल्हा ग्रामीण भाजप पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत या कामी लक्ष घालण्याची विनंती केली
ADB च्या सहाय्याने आधुनिकीकरण करीता भारतातील चार प्रकल्प निवडले गेले आहे त्यात पालखेड डावा तट कालवा व पूर्णा पाटबंधारे प्रकल्प हे महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांपैकी रािम्प प्रकल्प अंतर्गत निवडले गेले आहेत. पालखेड डावा तट कालवा प्रकल्पाच्या नुतनीकरणाच्या व आधुनिक करण्याच्या अनुषंगाने सामाजिक आर्थिक प्रगती साधणारे उदिष्ट ठरविण्यात आले आहे.

पालखेड डावा तट कालवा आधुनिकीकरण हे काम‌ नशिक जिल्हा अंतर्गत दिंडोरी, निफाड येवला या तालुक्यांमधून पुढे जात अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यातून मार्गक्रमण करत पुढे संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असे एकूण एकूण ४१५८० हेक्टर. सिंचन क्षेत्रा करीता प्रस्तावित आहे .त्यास एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. या कालव्याच्या लाभक्षेत्रातील मुख्य पीक द्राक्ष असून सदर कालव्यावर १६० पाणी वापर संस्था कार्यरत आहे. १०० संस्था नवीन कायद्याप्रमाणे प्रस्तावित ६० नवीन कायद्याप्रमाणे स्थापन करण्यासाठी प्रगती पथावर कामकाज करत आहे.पालखेड डावा तट कालव्याचे ADB च्या विशेष सल्लागारां मार्फत विविध प्रकारचे संर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे ADB च्या विशेष सल्लागारां मार्फत प्रारूप आय एम तयार करण्यात आहे. प्रारूप आय एम पी च्या आधारे रु १२८२.२० कोटी इतक्या रक्कमेचा प्रस्ताव तयार करून शासनास पुढील मंजुरी करीता सादर करण्यात आलेले आहेत, त्यापैकी रु ३१.२० कोटी सविस्तर प्रकल्प अहवाल व त्या अनुषंगिक कामे करण्या करीता प्रस्तावित असताना
वित्त व नियोजन विभाग यांच्याकडे बऱ्याच दिवसांपासून सदर फाईल प्रलंबित आहे त्यास वित्त विभागाची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. तरी SIMP (सिन्प) अंतर्गत ADB था सहाय्याने जलसंपदा विभाग पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिकच्या पालखेड डावा कालव्याचे आधुनिकीकरण करण्याच्या रु १२८२.२० कोटी इतक्या रक्कमेचा राज्य शासनाची मान्यता मिळावी, व या भागाला मुबलक प्रमाणात पाणी पिण्याचे व सिंचनाचे पाणी मिळण्यासाठी शासनाने यात लक्ष द्यावे यासाठी ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत पालखेड डाव्या कालव्याला नव संजीवनी देण्याची विनंती केली.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

शेअर करा.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!