# संत बार्णबा विद्यालयात शिक्षक दिन संपन्न, दिनांक ५ सप्टेंबर रोजी संत बार्णबा – जन आवाज न्युज
आरोग्य व शिक्षण

संत बार्णबा विद्यालयात शिक्षक दिन संपन्न, दिनांक ५ सप्टेंबर रोजी संत बार्णबा

Amazon.in/ONLINE SHOPPING

 

मनमाड:उच्च प्राथमिक विद्यालय व संत वार्णता माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रथम सकाळ सत्रात इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना विश्रांती देऊन सर्व प्रली ते ९वी चे वर्ग चालविले गुलांनी शिक्षका सारखा पोषाक व मुलींनी साड्‌या नेसून छान शिक्षिका

होण्याचा अनुभव घेतला महिला मुख्याध्यापिका साक्षी दिवाकर होती तर व पुरुष मुख्‌याध्‌यापक म्हणून सिद्धांत माकुणे यांनी छान भूमिका केल्या त्यानंतर दुसऱ्या सत्रात डॉ. सर्वपली राधाकृष्णन भारताचे माजी राष्ट्रपती यांच्या प्रतिमेस विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती भावना जावळे मैडम व माध्यमिक विभागाने सुख्याध्यापक भी. कराड सर यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पुजन करून अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. कराड सर होते. अनेक विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करून डॉ. सर्व पट्टी राधाकृष्णन यांच्या विषयी माहीती सांगितली काही मुलींनी शिक्षकाची भूमिका किती कठिण व महत्त्वाची असते हे आपले अनुभव सांगितलेः सर्व विद्यार्षांनी सर्व शिक्षकांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन शिक्षकदिनी सत्कार केला. श्रीमती सुनिता ओहोळ मॅडम यांनी मुलांना छान मार्गदर्शन केले व शिक्षकाचे महत्व व विद्यायची निष्ठा याबाबत सुरेख मार्गदर्शन केले. इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे छान नियोजन केले होते त्यांना काशिक्षिका श्रीमती शेजवळ मॅडम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमांस सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्ष‌केतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

शेअर करा.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!