# मनमाड शहर पोलिसांनी पकडला गावठी कट्टा. – जन आवाज न्युज
क्राईम स्टोरी

मनमाड शहर पोलिसांनी पकडला गावठी कट्टा.

जन आवाज न्यूज नेटवर्क.

Amazon.in/ONLINE SHOPPING

मनमाड :नाशिक जिल्ह्यात मागील काळात अवैध अग्निशस्त्र वापरून गुन्हे घडले असल्याने त्यावर प्रतिबंध व्हावा याकरीता अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मा. श्री. विक्रम देशमाने पोलीस अधीक्षक यांनी दिले होते.

पोलीस निरीक्षक श्री. विजय करे यांना मनमाड शहरात एक इसम अवैध अग्निशस्त्र घेवून येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. गुप्त बातमीच्या आधारे मनमाड शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोना गणेश नरोटे, पोना पंकज देवकाते, पोकॉ संदीप झाल्टे, पोकों रणजित चव्हाण, पोकों राजेंद्र खैरनार अशांनी सापळा रचून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसम करण महेंद्र साळवे, वय २६, रा. घोडके नगर, ग्रामपंचायत गार्डनजवळ, पिंपळगाव ब., ता. निफाड जि. नाशिक यास ताब्यात घेवून त्याचेकडून एक गावठी बनावटीचे अग्निशस्त्र जप्त करण्यात आले आहे. अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमाविरूध्द मनमाड शहर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३ / २५ अन्वये गुन्ह्याची नोंद करून अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा.श्री. विक्रम देशमाने पोलीस अधीक्षक मा.श्री. अनिकेत भारती- अपर पोलीस अधीक्षक व मा.श्री. सुरज गुंजाळ उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली मनमाड शहर पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलीआहे.

पोलीस निरीक्षक श्री. विजय करे यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या किंवा विक्री करणाऱ्या व्यक्तीबद्दलची गोपनीय माहिती व्यक्तीशः भेटून द्यावी. गोपनीय माहिती देणाऱ्या इसमाची ओळख उघड केली जाणार नाही बाबत आवाहन केले आहे.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

शेअर करा.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!