# धार्मिक दंगलींच्या गुन्ह्यात महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर असून पुन्हा राज्यात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केली जात आहे – राजेंद्र पातोडे. – जन आवाज न्युज
क्राईम स्टोरी

धार्मिक दंगलींच्या गुन्ह्यात महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर असून पुन्हा राज्यात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केली जात आहे – राजेंद्र पातोडे.

जन आवाज न्यूज नेटवर्क.

Amazon.in/ONLINE SHOPPING

महाराष्ट्र:धार्मिक दंगलींच्या गुन्ह्यात महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर असून पुन्हा राज्यात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केली जात आहे – राजेंद्र पातोडे.

धार्मिक दंगलींच्या गुन्ह्यात महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर असून पुन्हा राज्यात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केली जात आहे. धार्मिक तेढ निर्माण करणारे, पोलिसाच्या कुटुंबाची अवमान आणि बांग्लादेश मधील अत्याचार ह्याचे नावावर राज्यात तोडफोड करण्यात येत आहे.धार्मिक धूर्विकरणाचा परिणाम राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर झाला आहे.धार्मिक दंगलींच्या गुन्ह्यात महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या स्थानावर आहे.भाजपवाले आणि उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणविसांनी खुली सूट दिल्याने राज्यात तणाव असून राज्यात दंगली पेटल्यास त्यास फडणवीस जबाबदार असतील असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश युवा महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केला आहे.

देशात धार्मिक मुद्यांवरून हिंसक वळण घेणाऱ्या घटनांमध्ये भाजप सत्तेत आल्यावर मोठी वाढ झाली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये जाहीर झालेल्या ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार देशात २०२२ मध्ये सर्वाधिक दंगलीचे गुन्हे महाराष्ट्रात दाखल आहेत.डिसेंबर २०२३ च्या ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार गतवर्षात महाराष्ट्रात ८ हजार २१८ दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले. ज्यात, राज्यातील ९ हजार ५५८ नागरिक दंगलीमुळे प्रभावित झाले.

तर, दंगलीच्या घटनांमध्ये महाराष्ट्रापाठोपाठ बिहार, उत्तर प्रदेशचा देखील नंबर लागतो. २०२२ मध्ये महाराष्ट्रात ८ हजार २१८ दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनां मध्ये राज्यातील ९ हजार ५५८ नागरिक दंगलीमुळे प्रभावित झाले. तर, दुसऱ्या क्रमांकावर बिहार असून, गेल्यावर्षी बिहारमध्ये ४ हजार ७३६ दंगलीचे गुन्हे दाखल झाले. सोबतच उत्तर प्रदेशमध्ये ४ हजार ४७८ दंगलीचे गुन्हे दाखल असून उत्तर प्रदेश राज्य देशात तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

सरकारचा अजेंडा विकासाचा नसून दंगलीचा आहे, हेच आकडेवारी सिद्ध करीत असून दंगल आणि धार्मिक ध्रुवीकरण करून लोकसभा निवडणुकी साठी राज्याचे वातावरण पेटवत ठेवण्याचा प्रयत्न राज्यातील जनतेने यशस्वी होवू दिला नाही.देशात राज्याला एका कलंकित बाबी साठी एक नंबर बनविणारे देवेंद्र फडणवीस राज्यातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था बाधित करण्यासाठीं जाणीवपूर्वक पाठबळ देत असल्याचे साडे नऊ हजार दंगलीचा आकडा हाच पुरावा ठरतो.अश्यात पुन्हा जाणीवपूर्वक राज्यात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.त्याला भाजप आणि गृहमंत्री ह्यांची संमती दिसत असून निवडणुक पूर्वी राज्यात दंगल घडविण्याचे कारस्थान रचले जात आहे. राजेंद्र पातोडे प्रदेश महासचिव वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

शेअर करा.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!