# खाजगी ज्ञानेश्वरी क्लासेस चालकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग… – जन आवाज न्युज
क्राईम स्टोरी

खाजगी ज्ञानेश्वरी क्लासेस चालकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग…

जन आवाज न्यूज नेटवर्क.

Amazon.in/ONLINE SHOPPING

नाशिक:इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला फळ्यावर कविता लिहिण्यास सांगत , अंगलट करून स्त्री मानस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्यामुळे एका शिक्षकाविरोधात अंबड पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सिडकोतील उपेंद्र नगर येथे ज्ञानेश्वरी क्लासेस येथे पाचवी इयत्तेत शिकणारी एक विद्यार्थिनी संध्याकाळी क्लासला जाऊन घरी आल्यानंतर काहीही न बोलता येऊन बसली.

तिच्या शांततेचं आईला आश्चर्य वाटले. आईने तिला विश्वासात घेऊन काय झाले याबाबत विचारना केली असता मी उद्यापासून क्लासला जाणार नाही असे सांगितले.

     क्लासला न जाण्याचे सविस्तर कारण विचारले असता मुलीने घडला प्रकार कथन केला.

क्लासमध्ये ती एकटी बसली असतांना संशयित क्लास चालक तथा शिक्षक कृष्णा गजानन दहिभाते(32,उपेंद्र नगर) याने फळ्यावर कविता लिहिण्यास सांगितले. कविता लिहीत असतांना दहिभाते याने मागे येऊन अंगलट करत अश्लील कृत्य केले. तर ही बाब वडिलांना सांगू नको , सांगितलं तर उलट तुझीच तक्रार करेल असा दमही दिला.

   त्यानंतर पीडित मुलीच्या आई वडिलांनी अंबड पोलिसात फिर्याद दिली, याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे करीत आहे.तर संशयीत कृष्णा योगेश दहिभाते यास अटक करण्यात आली आहे.

उपेंद्र नगर येथे असलेल्या ज्ञानेश्वरी क्लास चालविणारा संशयित कृष्णा गजानन दहिभाते हा मुलांना विज्ञान व इंग्रजी विषय शिकवतो, तर त्याची पत्नी गणित व इतर विषय शिकवते. अंबड पोलिसांनी याबाबत तात्काळ दखल घेत पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीहून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या क्लास शिक्षकास तात्काळ अटक केली आहे.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

शेअर करा.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!