# मनमाड नगर परिषद पथ विक्रेता समिती सार्वत्रिक निवडणुक 2024 मा, कादिर शेख यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल चांदवड रोड टपरी धारक तर्फे कादिर शेख यांचे शॉल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार – जन आवाज न्युज
ताज्या घडामोडी

मनमाड नगर परिषद पथ विक्रेता समिती सार्वत्रिक निवडणुक 2024 मा, कादिर शेख यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल चांदवड रोड टपरी धारक तर्फे कादिर शेख यांचे शॉल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार

जन आवाज न्यूज नेटवर्क.

Amazon.in/ONLINE SHOPPING

 मनमाड:- मनमाड नगर परिषद पथ विक्रेता समिती सार्वत्रिक निवडणुक 2024 नुकतीच पारपडली असुन या निवडणुकीत अल्पसंख्यांक सर्वसाधारण पुरुष या गटात कादिर शेख यांची बिनविरोध निवड झाली आहे.

 मनमाड शहरात गोरगरीब टपरी धारकांच्या न्याया व हक्कासाठी सतत संघर्ष करून लढा देणारे कादिर शेख यांच्या कार्याची पावती म्हणावी की त्यांची मनमाड नगर परिषद पथ विक्रेता समितीवर बिनविरोध निवड झाली आहे

 मनमाड शहर चांदवड रोड टपऱ्याविषयी कादिर शेख यांनी आंदोलने करून कागदोपत्री पाठपुरावा करून सतत लढा दिलेला आहे कादिर शेख यांनी सन 2018 ते आज पर्यंत चांदवड रोडवरील टपरी धारकांच्या एकही टपरीला धक्का लागू दिलेला नाही,  तसेच मनमाड शहर पथ विक्रेतांना केंद्र शासनाची खेळता भांडवल योजना बैंक लोन व फेरीवाला नोंदणी इतर संदर्भात

कोणत्याही प्रकारे अडचण आल्यास कादिर शेख यांनी तात्काळ मदत केली आहे.

 या सर्व सामाजिक कार्याची पावतीच आहे की कादिर शेख यांची मनमाड नगर परिषद पथ विक्रेता समिती सार्वत्रिक 2024 या निवडणुकीत बिनविरोध निवड झालेली आहे.

 त्यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मनमाड शहरासोबत जिल्हाभर सोशल मीडियावर कादिर शेख यांना शुभेच्छा चा वर्षाव झालेला आहे, तसेच कादिर शेख यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल चांदवड रोड टपरी धारक संघटना, मनमाड यांच्यातर्फे कादिर शेख यांचा शॉल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले आहे.

या वेळी संजय केकाण, निलेश गुरव, मोहिनुद्दीन सैय्यद, संतोष सव्वा खंडे,जावेद शेख,माधव बोराडे, अशपाक शेख, शकील शेख, अकील सैय्यद,इतर बांधव उपस्थित होते,

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

शेअर करा.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!