# “एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत, मनमाड महाविद्यालयाच्या रा. से.यो विभागातर्फे वृक्षारोपण. – जन आवाज न्युज
आरोग्य व शिक्षण

“एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत, मनमाड महाविद्यालयाच्या रा. से.यो विभागातर्फे वृक्षारोपण.

जन आवाज न्यूज नेटवर्क.

Amazon.in/ONLINE SHOPPING

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दत्तक गाव शिंगवे येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम व उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले यांच्या मार्गदर्शनाखाली 100 रोपे व देशी झाडांच्या 500 बियांचे रोपण करण्यात आले.शिंगवे येथील मतोबाच्या टेकडीवर रा. से. यो.शिबिरा अंतर्गत खोदण्यात आलेल्या सी.सी.टी चरमध्ये धरणीमातेच्या संवर्धनार्थ रा. से. यो. स्वयंसेवकांकडून विविध देशी झाडांचे तसेच देशी झाडांच्या बिया यांचे रोपण करण्यात आले. यावेळी स्वयंसेवकांनी प्रत्येकाने “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेतून लावले तर आपल्या पृथ्वीतलावरील तापमान वाढ, जल संकट यासारख्या समस्या कमी होतील, या संदर्भातील जनजागृती केली. या प्रसंगी महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा डी.व्ही. सोनवणे, डॉ. रघुनाथ वाकळे,शिंगवे गावचे सरपंच आत्माराम खताळ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी, प्रा सोमनाथ पावडे, प्रा. कविता काखंडकी,दर्शन पाटील यांनी केले,महाविद्यालयातील सर्व रा.से.यो. स्वयंसेवक व स्वयंसेविकां या उपक्रमात उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला…

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

शेअर करा.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!