# दर वर्षी च्या तुलनेत यंदा मनमाड शहरात जास्त प्रमाणावर मोहर्रम शरबत वाटप (शबील ) कार्यक्रमाचे आयोजन झाले, – जन आवाज न्युज
धार्मिक व आध्यात्मिक

दर वर्षी च्या तुलनेत यंदा मनमाड शहरात जास्त प्रमाणावर मोहर्रम शरबत वाटप (शबील ) कार्यक्रमाचे आयोजन झाले,

जन आवाज न्यूज नेटवर्क.

Amazon.in/ONLINE SHOPPING

मनमाड :- मोहर्रम महिन्याच्या उर्दू 10 तारखेस योमे आशुरा असे म्हणतात या दिवसाचे मुस्लिम समाजात विशेष आणि महत्वाचे वेगळास्थान आहे, आशुरा दिवशी मुस्लिम बांधवानंतर्फे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आयोजन करून शरबत वाटप कार्यक्रम करून सन साजरा केला जातो,

यॊमे आशुराचा दिवस, आशुरा दिवस म्हणजे जंग ए करबला.

जंग ए करबला. मध्ये प्रेषित मुहम्मद साहेबांच्या परिवारातील 72 लोकांना, यजीदी लोकांनी तीन दिवस बिन अन्न व पाण्याचं ठेऊन, कत्ल (शहीद ) केल आहे, तो दिवस 10 मोहर्रमचा होता,

जंग ए करबला पूर्वी काळात यजीद हा आपल्या पर्यायाने आपल्या मर्जीने इस्लाम धर्मात काही गोष्टी रुजवत होता, तो मर्जीने इस्लाम धर्म चालवण्याच्या मार्ग काढत होता,

इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद सल्ल, अलैही व सल्लम यांचे नातु व हजरत मौला अली रजी, यांचे पुत्र, हजरत ईमाम हुसैन रजी, यांना आपल्या आजोबानी दिलेल्या इस्लाम धर्माशी छेडछाड हे कदापी मान्य न्हवत त्यांनी आपले आजोबा, प्रेषित साहेबांनी दिलेले सुंदर पद्धतीचे इस्लाम धर्माची रक्षा करतांना. करबला मध्ये आपल्या कुटुंबातील 72 लोकांचे बलिदान दिले आहे, त्या 72 लोकांमध्ये हजरत ईमाम हुसैन यांचं 06 महिन्याचा सर्वात लहान तहानलेल्या चिमुकला हजरत अली असगर यांना देखील इस्लाम धर्मासाठी आपले प्राणाची आहुती द्यावी लागलेली आहे,

करबला मध्ये 10 मोहर्रम ला प्रेषित मोहम्मद सल्ल अलैही सल्लम,यांचे कुटुंब हजरत ईमाम हुसैन आणि त्यांचे 72 परिवाराच्या लोकांनी दिलेल्या बलिदाना ची आठवण म्हणून मुस्लिम बांधवांतर्फे शबील लाऊन प्रत्येक तहानलेल्या लोकांना थंड शरबत वाटप केले जाते, तसेच इतर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून करबला मध्ये शहीद झालेल्या 72 शहीदांची आठवण केले जाते,

मनमाड शहरात देखील 10 मोहर्रम योमे आशुरा दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन केले जाते, विशेष म्हणजे मनमाड शहरात, एकात्मता चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कसाई मोहल्ला, हुसैनी चौक टकार मोहल्ला, राजवाडा, नुर चौक, ईदगाह, रेल्वे स्टेशन चौक, मालेगाव नाका, पाकिजा कॉर्नर, चंदनवाडी, नजराना, गौसिया नगर, आयेशा नगर, बोहरी कंपाउंड, आंबेडकर चौक मुस्लिम कॉलनी, गौतम नगर, आंबेडकर नगर, 52 नंबर, कैम्प भागात, असे मनमाड शहरातील प्रत्येक एरियात गल्लीत, दर वर्षी च्या तुलनेत यंदा शहरात जास्त प्रमाणावर मोहर्रम शरबत वाटप (शबील ) कार्यक्रमाचे आयोजन झाले आहे,

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

शेअर करा.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!