# गोरगरिबांच्या पोटापाण्यावर नगरपरिषद ने लाथ मारू नये टपरी धारक संघटना तर्फे पोटाला काळ्या पट्या बंधूना केले धरणे आंदोलन.  – जन आवाज न्युज
ताज्या घडामोडी

गोरगरिबांच्या पोटापाण्यावर नगरपरिषद ने लाथ मारू नये टपरी धारक संघटना तर्फे पोटाला काळ्या पट्या बंधूना केले धरणे आंदोलन. 

जन आवाज न्यूज नेटवर्क.

Amazon.in/ONLINE SHOPPING

 

मनमाड :- मनमाड नगरपरिषद ने 40 ते 50 गोरगरीब टपरीधारकांना नोटीसे दिली आहे,सदर नोटीसात गोरगरीब टपरीधारकांवर तीन दिवसात कारवाई करण्याचा ईशारा मनमाड नगरपरिषदने दिलेला होता.

या नोटिसा विरुद्ध टपरी धारक संघटनाने दि 25/07/20024 रोजी निवेदन आक्रमक भूमिका घेतलेली होती.दि 26/07/2024 रोजी मनमाड नगरपरिषद खाली पोटाला काळ्या पट्या बांधून धरणे आंदोलन करण्याचा ईशारा दिलेला होता, त्या नुसार 26/07/2024 रोजी टपरी धारक संघटनातर्फे मनमाड नगरपरिषद खाली पोटाला काळ्या पट्या बांधून धरणे आंदोलन करण्यात येऊन मागणीचे निवेदन देण्यात आले,

टपरी धारक संघटना ने मनमाड नगरपरिषदला दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की,

पाकीजा कॉर्नर अण्णाभाऊ साठे स्मारक जवळ आमचे, मनमाड नगर परिषद तर्फे ठराव करून जागा भाडेतत्वा वर घेऊन तसेच मनमाड नगरपरिषदचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन, 30 ते 40 वर्षापासून लोखंडी टपरी हातगाळे वगैरे ठेवून आमचे व्यवसाय उदरनिर्वाह सुरू आहे.

आम्ही नगरपरिषदेचा डेली कर पावती देखील अदा करतो, त्या मुळे नगरपरिषद च्या उत्पन्नात नक्कीच वाढ होत आहे.

 आमच्या दुकानांमुळे अण्णाभाऊ साठे स्मारकाला कोणतेही नुकसान नाही. म्हणून स्वतः अण्णाभाऊ साठे स्मारक समिती यांची आज पर्यंत कुठलीही तक्रार नाही,तसेच आमच्या टपऱ्यामुळे शहरातील रहदारीस कुठलीही प्रकारची अडचण होत नाही,

मनमाड नगर परिषदने कुठलीही प्रकारची शहानिशा व विचार न करता थेट 40 ते 50 गोरगरिबांना कारवाईची नोटीसे दिली हे योग्य नाही.?

 मनमाड नगरपरिषद तर्फे गोरगरिबांना नोटीसे देऊन त्यांचे दुकानावर कारवाया करून उदरनिर्वाह उध्वस्त करण्याचे प्रयत्न केले जातं आहे.

 नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित झालेले असून, तालुक्यातील व्यवसाय हे मंद झालेले आहे परिणामी मनमाड शहरातील नागरिकांना आपले पोट पाणी भरण्यासाठी नाशिक व इतर ठिकाणी बाहेर गावी जावे लागत होते, परंतु तालुक्याचे कुटुंब प्रमुख मा,आमदार सुहास अण्णा कांदे साहेब, यांनी स्वतः आपल्या तर्फे रोजगार मेळावे आयोजित करून,शहरातील युवकांना रोजगाराची संधी हाताला काम उपलब्ध करून दिले आहे.दुष्काळग्रस्त तालुक्यात या भयानक मंदीच्या काळात तसेच पावसाळा मुळे शहरातील धंदे पाणी हे मंद असतांना अश्या परस्थितीत गोर-गरीब टपरीधारक हे दिवसभर परीश्रम करून आपले व आपल्या परिवाराचे कसे तरी उदरनिर्वाह करण्याचे प्रयत्न करत आहे,जर मनमाड नगर परिषद तर्फे गोरगरीब लोकांच्या टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली तर या गोरगरीब टपरीधारकांचे पोट भरण्याचे साधन त्यांचे उदरनिर्वाह हे पूर्ण उध्वस्त होणार आहे. व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन आत्महत्या करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही.

 40 ते 50 लोकांचे व त्यांच्या परिवाराचे उप जीविका चे साधन त्यांचे उदरनिर्वाह उध्वस्त होईल अशी मनमाड नगरपरिषदने कुठलीही कारवाई करू नये अन्यथा वेळ पडली तर मनमाड नगरपरिषद च्या सूडबुद्दी च्या हुकूमशाही कारवाईच्या विरुद्ध आम्ही 40 ते 50 टपरीधारक पोटापाण्यासाठी सामुदायिक आत्मदहन करू याला जबाबदार कुठलेही विचार न करता आम्हाला नोटीस देणारे मनमाड नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहतील, पोटाला काळ्या पट्या बांधून धरणे आंदोलन केले आंदोलनात शहरातील इतर सामाजिक संघटनाणी देखील जाहीर पाठिंबा दिलेला आहे, 

टपरी धारक संघटना तर्फे निवेदन देतांना फरीद सैय्यद, हुसेन पठाण,अमजद शेख, सुरेश गांगुर्डे, कादीर शेख, दिगंबर बोरसे, शकिल शेख, जहीर शेख, सोनू सोपे,फारुख शेख (पापा) युनूस शेख, ,दीपक त्रिभुवन,हिरा परदेसी, अमजद पठाण, किरण सोपे, शाहिद शेख आदिनाथ बोरसे, आदीं उपस्थित होते.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

शेअर करा.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!