# मद्यधुंद तर्रर्र,अवस्थेत लोकांना धडक देऊन उलट अरेरावीची भाषा व शिवीगाळ करणाऱ्या मनमाड रेल्वे RPF पोलीस निरीक्षकावर, शेवटी मनमाड शहर पोलिसात गुन्हा दाखल. – जन आवाज न्युज
क्राईम स्टोरी

मद्यधुंद तर्रर्र,अवस्थेत लोकांना धडक देऊन उलट अरेरावीची भाषा व शिवीगाळ करणाऱ्या मनमाड रेल्वे RPF पोलीस निरीक्षकावर, शेवटी मनमाड शहर पोलिसात गुन्हा दाखल.

जन आवाज न्यूज नेटवर्क.

Amazon.in/ONLINE SHOPPING

मनमाड :- मनमाड शहरातील IUDP येथील रहिवासी अमोल दंडगव्हाळ यांनी मनमाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की.

दिनांक 28/07/2024 रोजी रात्री 11.20 ते 11.30 वाजेचे दरमियान माझी 7 वर्षीय मुलगी हिला घेवून माझे घरा समोर आमची मोटार सायकल क्रमांक MH41 S 3245 या मोटार सायकल वरून उतरत असतांना पाठीमागुन भरधाव वेगाने येणाऱ्या महेंद्र XUV गाडी जिच्यावर भारत सरकार असे नावा असलेली गाडी क्रमांक MH41 AS 7861 या गाडीने पाठीमागुन मला धक्का दिला. मी माझ्या मुलीस त्या धक्क्यातून गाडीवर पडतांना धरले. त्यानंतर सदर गाडीचे चालक नामे संदिपकुमार सुंदरर्सिंग देशवाला (RPF पोलीस निरीक्षक ) रा. मनमाड याने गाडीची काच खाली करुन मला व माझी मुलगी या दोघांना अवर्याच्या भाषेत शिवीगाळ करीत गाडीतुन खाली उतरुन मी कोण आहे तुला माहिती नाहीं तुला तुझ्या पोरी सकट ईथुन कपडे काढून मारेल.

अश्या प्रकारची माझ्या मुलीस लज्जा उत्पन् होईल अश्या गलीच्छ व अश्लील भाषेत शिवीगाळ व वर्तन केले. घडलेल्या प्रकारानंतर वाहनाचे धक्यांचा मोठा आवाज ऐकुन माझे कुटुंबीय व माझ्या आजु बाजुला राहणारे अफरोज रफिक आत्तार व इतर लोक जमा झाले असता त्यांचे समक्ष देखील सदर इसम याने मला व माझी मुलगी हिला वाईट साईट बोलवुन जिवे मारण्याची धमकी दिली. आजुबाजुला जमलेल्या लोकांनी सदर इसम संदिपकुमार सुंदरसिंग देशवाला रा. मनमाड ता. नांदगाव यास तुम्ही दारुच्या नशेत गाडी भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने गाडी चलवित होते असा समजविण्याचा बरचा प्रयत्न केला. परंतु सदर इसम याने दारुचे अथवा इतर अंमली पदार्थाचे नशेत शिवीगाळ व दमदाटी केली. संदिपकुमार सुंदरसिंग देशवाला महेंद्रा XUV गाडी क्रमांक MH41 AS 7861 ही दारुचे नशेत किंवा इतर अंमली पदार्थचे सेवन करुन निष्काळजी पणाने व भरधाव वेगात चालवून मला व माझी मुलगी जिवा हिला धक्का देवुन मुलीस लज्जा उत्पन् होईल अश्या गलीच्छ व अश्लील भाषेत शिवीगाळ व वर्तन केले. तरोच माझे कुटुंबीयांना वाइट साईट शिवीगाळ दामदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून या मद्यधुंद तर्रर्र, अवस्थेत भरधाव वेगाने मला धडक देऊन उलट पोलीस पदाचा गैरवापर करून या शासकीय लोकसेवकाने मलाच अरेरावीची भाषा व शिवीगाळ करणाऱ्या मनमाड रेल्वे RPF पोलीस निरीक्षका विरुद्ध मी मनमाड शहर पोलीस ठाणेत फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे.

या घटने नंतर मनमाड शहर पोलीस व उपजिल्हा रुग्णालय तर्फे सदर RPF पोलीस निरीक्षकाचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणी साठी पाठवण्यात आलेले आहे

पहाटी उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कार्य मनमाड शहर पोलिसांतर्फे करण्यात आले अशी माहिती फिर्यादी अमोल दंडगव्हाळ तर्फे देण्यात आलेली आहे,

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

शेअर करा.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!