# नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे फिर्यादींना ३१ लाख ३६ हजार मुद्देमाल प्रदान करण्यात आला. – जन आवाज न्युज
क्राईम स्टोरी

नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे फिर्यादींना ३१ लाख ३६ हजार मुद्देमाल प्रदान करण्यात आला.

Amazon.in/ONLINE SHOPPING

नाशिक:आज दि. ३१/०७/२०२४ रोजी पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने यांचे संकल्पनेतुन नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे गुन्हयांमधील फिर्यादींना मुद्देमाल प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामीण पोलीस दलातर्फे जिल्हयातील पोलीस ठाणे निहाय दाखल असलेल्या गुन्हयांमध्ये

हस्तगत केलेला किंमती मुद्देमाल तक्रारदारांना प्रदान करण्याचा कार्यक्रम पोलीस अधीक्षक

 

कार्यालय, आडगाव येथे पार पडला. मालाविरुध्दचे गुन्हयांमध्ये चोरीस गेलेले सोने-चांदीचे दागिने,

वाहने, मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच इतर मुद्देमाल मा. न्यायालयाचे आदेशाप्रमाणे संबंधीत तक्रारदारांना प्रदान करण्यात येतो. नाशिक ग्रामीण जिल्हयातील पोलीस ठाण्यांनिहाय दाखल असलेले मालाविरुध्दचे गुन्हयांमधील उघडकीस आलेले गुन्हयांमध्ये हस्तगत करण्यात आलेला सुमारे ३१ लाख ३६ हजार ९९६ रूपये किंमतीचा विविध मद्देमाल संबंधीत तक्रारदारांना वाटप करण्यात आला. प्रदान केलेल्या मुद्देमालात सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन व मोटर सायकल असा मुद्देमाल यावेळी उपस्थितांना वाटप करण्यात आला, यामुळे नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

सदर कार्यक्रमा प्रसंगी पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने यांचे मार्गदर्शनानुसार अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे यांचेसह पोलीस ठाण्यांचे मुद्देमाल कारकुन उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरीकांनी बाहेरगावी जातांना विशेष काळजी घ्यावी, किंमती दागिने, पैसे बँकेत ठेवावेत, बाहेर जातांना शेजा-यांना कल्पना द्यावी, शक्य असल्यास सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवावेत, तसेच मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन योग्य ती खबरदारी घेवुन पोलीस दलास सहकार्य करावे असे आवाहन उपस्थित नागरीकांना करण्यात आले.

 

 

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

शेअर करा.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!