# छत्रे विद्यालयात विश्व योग दिन उत्साहात – जन आवाज न्युज
आरोग्य व शिक्षण

छत्रे विद्यालयात विश्व योग दिन उत्साहात

जन आवाज न्यूज नेटवर्क

Amazon.in/ONLINE SHOPPING

मनमाड:केवळ एक दिवसापूरता योग न करता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग योग बनला पाहिजे. बुद्धी, पैसा या बरोबरच आपली शारीरिक सुधृदताही जीवनात महत्वाची आहे. ती वाढवण्याचा आज आपण संकल्प करूया! असे आवाहन आंतरराष्ट्रीय क्रिडा प्रशिक्षक व शाळेचे जेष्ठ पर्यवेक्षक प्रविण व्यवहारे यांनी विश्व् योग दिनाच्या निमित्ताने येथे केले.

 येथील छत्रे विद्यालयाने विश्व योगदिन भगवान महर्षी वाल्मिकी स्टेडियम वर उत्साहात साजरा केला.या प्रसंगी मैदानावर संस्थेचे जेष्ठ संचालक नाना कुलकर्णी,संचालक प्रसाद पंचवाघ,शाळेचे मुख्याध्यापक आर.एन. थोरात,उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,वरिष्ठ पर्यवेक्षक प्रविण व्यवहारे पर्यवेक्षिका संगीता पोतदार, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नामदेव जाधव,स्टेडियम चे केयर टेकर देवेंद्र चुनियान तसेच सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रथम मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.प्रविण व्यवहारे सरांनी संयोजन करत सर्व योगा प्रकार समजावले.व प्रत्येक प्रकारचे आपल्या आरोग्यासाठीचे महत्व सांगितले.राष्ट्रीय खेळाडू कृष्णा व्यवहारे व शाळेचे शिक्षक धनंजय भामरे यांनी केलेल्या प्रत्यक्षिका चे अनुकरण करत सर्व विद्यार्थी व शिक्षक, पदाधिकारी यांनी सर्व प्रकारची आसने केली.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

शेअर करा.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!